Maihar Bus Accident : मध्य प्रदेशमधील मैहर जिल्ह्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील बस ही प्रयागराजवरून नागपूरकडे जात होती, तर ट्रक महामार्गावर उभा होता. बस प्रयागराजवरून नागपूरकडे जात असताना नादान देहाट पोलीस ठाण्याच्या जवळ हा अपघात घडला. शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास दगडाने भरलेल्या डंपर ट्रक आणि बसची धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर घटनास्थळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी तत्काळ दाखल झाले होते. या अपघाताची माहिती देताना मैहरचे पोलीस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी सांगितलं की, “सहा जखमींची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना सतना येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर उर्वरित लोकांवर मैहर आणि अमरपाटण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत”, असं सुधीर अग्रवाल यांनी म्हटलं. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
हेही वाचा : नेपाळमधील पुरात ६६ जणांचा मृत्यू, ७९ बेपत्ता
VIDEO | Madhya Pradesh: Rescue operation underway as dozens were injured after a bus collided with a parked truck in Maihar. More details awaited.
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/ugSX5z3q7d
समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान मैहर जिल्ह्यात एक ट्रक आणि एक प्रवासी बसमध्ये धडक झाली. यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे. मैहरच्या नादान देहत पोलीस ठाण्याच्या परिसरात हा अपघात झाला आहे. हा अपघात घडल्यानंतर बसच्यामधून जोरादार आरडाओरडा झाला. यावेळी सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसच्या कंडक्टरचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की अपघात घडल्यानंतर बसचे लोखंड गॅस कटरने कापून लोकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, बसने ट्रकला धडक दिल्यानंतर बस ट्रकमध्ये अडकली होती. लोकांना बस मधून बाहेर काढल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने बस बाजूला करण्यात आली.