Maitreyee Shitole Air India Pilot Who Saved 141 lives performed emergency landing AXB613 : ११ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूमधील त्रिचीवरून शारजाहला जाणारं एअर इंडिया एक्सप्रेस हे विमान काही तांत्रिक समस्येमुळे तब्बल दोन तास हवेतच घिरट्या घेत होतं. हे विमान पुढे जाऊ शकलं नाही. अखेर, हे विमान सुरक्षितपणे त्रिची विमानतळावर उतरवण्यात आलं. एअर इंडिया फ्लाइट नंबर AXB613 ने सायंकाळी ५.४३ वाजता त्रिची विमानतळावरून उड्डाण केलं होतं. विमानाच्या उड्डाणानंतर काही मिनिटात विमानात तांत्रिक समस्या उद्भवल्या. त्यानंतर वैमानिकांनी विमान माघारी वळवलं. हे विमान जवळपास दोन तास आकाशात घिरट्या घालत होतं. अखेर काही वेळाने विमान त्रिची विमानतळाच्या धावपट्टीवर सुखरूप उतरवण्यात आलं. मात्र, दोन तास हे विमान हवेत असताना विमानातील प्रवासी, वैमानिक व क्रू सदस्यांचा जीव टांगणीला लागला होता. तसेच हे विमान सुखरूप उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या छातीचा ठोका चुकला होता.

या विमानाच्या वैमानिकांनी टेकऑफनंतर ३ तासांनी ते विमान सुरक्षितपणे उतरवलं. या घटनेनंतर लोकांनी विमानाचे मुख्य वैमानिक व सहवैमानिकांवर समाजमाध्यमांद्वारे कौतुकाचा वर्षाव केला. तसेच तमिळनाडूच्या राज्यपालांनी देखील वैमानिकांचे आभार मानले. इक्रोम रिफादली फहमी झैनाल असं या विमानाच्या प्रमुख वैमानिकाचं नाव असून मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळे असं सहवैमानिकाचं नाव आहे. मैत्रेयी ही मूळची दौंडची रहिवासी आहे. श्रीकृष्ण व रुक्मिणी शितोळे यांना त्या घटनेनंतर त्यांची मोठी मुलगी मैत्रेयीचा फार अभिमान वाटत आहे.

planes left wing was broken High Court rejected the claim for compensation of around 25 crores
विमानाचे डावे पंख तुटले; तब्बल २५ कोटींच्या नुकसान भरपाईचा…
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
How to book cheap flights using this feature Google Flights
How To Book Cheap Flights : आता विमानाने प्रवास करणं होईल स्वस्त? गूगलने आणलंय नवं फीचर; कसं वापरायचं बघा
What security protocols kick in when a flight gets a bomb threat
Security Protocols in Flight : विमान कंपन्यांना धमकी मिळाल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना आखल्या जातात? प्रवाशांची सुरक्षा कशी घेतली जाते?
Bomb Threat news
Bomb Threat : बॉम्बने विमान उडवण्याची तीन दिवसातली १२ वी धमकी, भारतात चाललंय काय?
What is Belly Landing pixabay
Belly Landing : विमानाचं बेली लॅन्डिंग कसं केलं जातं? आपत्कालीन स्थितीत प्रवाशांना वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय
Air India Express Flight
हेच खरे हिरो! १४१ प्रवाशांना विमानात तांत्रिक बिघाडानंतरही सुखरूप खाली उतरवणाऱ्या वैमानिकांवर कौतुकाचा वर्षाव; पाहा VIDEO!
Air India buys 85 Airbus
तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या हवेतच दोन तास घिरट्या; १४० प्रवासी करत होते प्रवास; अखेर झालं सुरक्षित लँडिंग!

हे ही वाचा >> “जस्टिन ट्रुडो यांनी राजकीय फायद्यासाठी भारताशी…”, मायदेशी परतलेल्या उच्चायुक्तांचा गंभीर आरोप

सहावीत असतानाच पायलट व्हायचं स्वप्न पाहिलं

श्रीकृष्ण शितोळे हे दौंडमध्ये ट्रान्सपोर्ट व क्रेनचा व्यवसाय करतात. तर रुक्मिणी या खेड-शिवापूरमध्ये पेपर-ट्युब बनवण्याचा कारखाना सांभाळतात. श्रीकृष्ण शितोळे हे त्यांच्या मुलीच्या आजवरच्या यशाबद्दल म्हणाले, “मैत्रेयी सहवीत असताना आम्ही दिल्लीहून पुण्याला फ्लाईटने येत होतो. त्या विमानाची वैमानिक एक महिला होती. त्यावेळी मैत्रेयीने त्या महिला पायलटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. विमानातील कर्मचाऱ्यांनी तिला विमानाच्या कॉकपिटमध्ये जाऊ दिलं. तेव्हा मैत्रेयी म्हणाली, मलाही विमान उडवायचं आहे. त्याच दिवशी तिने ठरवलं की आपणही पायलट व्हायचं”.

हे ही वाचा >> Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा; म्हणाले, “कठोर प्रत्युत्तर…”

चष्म्यामुळे पायलट होण्याची आशा सोडलेली

मैत्रेयीचे वडील म्हणाले, “१० वी उत्तीर्ण झाल्यानंतर मैत्रेयीने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. दरम्यान, आम्हाला सांगण्यात आलं की, चष्मा नसलेले (पूर्णपणे निरोगी दृष्टी असलेले) उमेदवारच पायलट होऊ शकतात. मात्र मैत्रेयीला चष्मा होता. तेव्हा इंटरनेट इतकं सुलभ नव्हतं की आम्ही त्याची शहानिशा करू शकू. तसेच आमच्यासारख्या मराठा कुटुंबातील मुलींची २१-२२ व्या वर्षी लग्नं लावून दिली जातात. त्यामुळे या मुली करीअर व इतर मार्गदर्शनापासून दूर राहतात. तसेच चष्म्यामुळे मैत्रेयीने तिचं स्वप्न सोडून दिलं होतं. मैत्रेयीने भौकिशास्त्रात बीएससी करायचं ठरवलं. त्यानंतर तिला माहिती मिळाली की तिची दृष्टी पायलटसाठी स्वीकार्य श्रेणीत आहे. त्यामुळे पदवीनंतर ती पायलट प्रशिक्षणासाठी गेली. मैत्रेयीने न्यूझीलंडमधील ड्युनेडिन येथील मेनलँड एव्हिएशन कॉलेजमधून व्यावसायिक पायलट परवाना मिळवला आहे”.

हे ही वाचा >> Yahya Sinwar : याह्या सिनवार बोगद्यात लपला होता, तर पत्नीकडे दिसली २७ लाखांची बॅग; इस्रायलकडून Video शेअर

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मैत्रेयीच्या आई-वडिलांना धक्का

त्रिची विमानतळावर घडलेल्या घटनेनंतर मैत्रेयी तिच्या खोलीत गेली आणि तिने तिच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. तो प्रसंग सांगताना मैत्रेयीची आई रुक्मिणी म्हणाल्या, “तिचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले होते. काही क्षणासाठी पायातून त्राण निघून गेले होते. त्यानंतर आम्ही तिच्या वडिलांना या घटनेची माहिती दिली”.

मैत्रेयीचे वडील म्हणाले, “तिने खूप धीराने, संयमाने विमान जमिनीवर उतरवलं. आम्हाला तिचा अभिमान आहे. त्या दिवशी आम्हाला ५०० हून अधिक फोन आले. असंख्य संदेश आले”.

“ती पायलट झाल्यानंतर आम्ही तिला एकच गोष्ट सांगितली की तू जेव्हा-जेव्हा विमान उडवशील तेव्हा त्या विमानात असणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी तुझ्यावर असणार आहे, त्यांची काळजी घे. आमच्या मुलीने ती गोष्ट लक्षात ठेवली, याचा आम्हाला अभिमान आहे”, असं रुक्मिणी म्हणाल्या.