मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरूवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार झाला असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास बस दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बस दुभाजकाला धडकल्यानंतर बसमधील बहुतांश प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले. कर्नाटकातील मजुरांना घेऊन ही बस मुंबईकडे येत होती. यावेळी बसचा वेग प्रचंड होता. त्यामुळे दुभाजकावर धडकल्यावर अनेकजण बसच्या खिडकीतून बाहेर फेकले गेले. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी खोपोली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा