टोकियो येथे सोमवारी सकाळी ६ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला असून, त्यात १७ जण किरकोळ जखमी झाले. सुनामीचा धोका नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जपानमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस आनंदात घालवण्याच्या तयारीत असताना पहाटे भूकंपाने इमारती हादरल्या.  ७४ वर्षांच्या महिलेचा खांदाच निखळला. काही ठिकाणी मांडण्यांतील वस्तू खाली पडल्या. फर्निचर हादरले. भूकंपाचे केंद्र टोकियोच्या नैर्ऋत्येला असलेल्या इझू ओशिमा बेटांवर होते असे जपानच्या हवामान खात्याने सांगितले. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण विभागाने सांगितले, की भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर होती व त्याचे केंद्र १५५ किलोमीटर खोलीवर होते. मार्च २०११ मध्ये जपानला बसलेल्या ९ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यानंतर तेथे सुनामी लाटा उसळल्या होत्या, त्यात १८ हजार लोक मरण पावले होते.

Story img Loader