भगवान श्रीरामाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत प्राणप्रतिष्ठा आज अयोध्येतील राम मंदिरात करण्यात आली. ५०० वर्षांपासून या दिवसाची प्रतिक्षा होती. अखेर भगवान श्रीरामाची मूर्ती राम मंदिरात विराजमान झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राम मंदिर तिथंच बांधलंय जिथं बांधण्याचा संकल्प केला होता, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीयेत. मन भावूक झालं आहे. तुम्हाला सगळ्यांनाही हेच वाटत असेल. या ऐतिहासिक आणि पावन क्षणी भारतातलं प्रत्येक ठिकाण अयोध्याधाम आहे. प्रत्येक मार्ग राम जन्मभूमीच्या दिशेने येत आहे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“प्रत्येकाच्या मनात राम-नाम आहे. प्रत्येकाचे डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. पूर्ण राष्ट्र राममय आहे. असं वाटतंय आपण त्रेतायुगात आलो आहोत. आज रघुनंदन सिंहासनाव विराजमान झाले आहेत. आज प्रसन्नता आणि संतोषाचे भावना आहेत. भारताला याच दिवसाची प्रतिक्षा होती. या दिवसाची आपण पाच शतके वाट पाहत होतो”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> Ram Mandir Ayodhya Inauguration Live: मी आज प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…- नरेंद्र मोदी

समाजातील सर्व जाती वर्गाने राम मंदिरासाठी प्रयत्न केले

श्रीराम जन्मभूमी हे असं पहिलं प्रकरण असेल, जिथे एखाद्या देशात त्या देशातील बहुसंख्यांक समाजाने त्यांच्या मंदिर निर्माणासाठी एवढी वर्षे लढाई लढली असेल. समाजातील सर्व जाती वर्गाने राम मंदिरासाठी प्रयत्न केले. आज शेवटी तो दिवस आलाच. आज आत्मा प्रफुल्लित आहे. मंदिर तिथंच बनवलं आहे जिथं बनवण्याचा संकल्प केला होता, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

“संकल्प आणि साधनेच्या सिद्धीसाठी, आपली प्रतिक्षा संपवण्याकरता आणि संकल्पाच्या पूर्णतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार आणि अभिनंदन”, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. “अयोध्या नगरीत आता गोळ्यांचा गडगडाट नसेल, संचारबंदी लागणार नाही”, असं आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी दिलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majority of society in the country chief minister yogi adityanath on pranpratishta of ram idol in ayodhya sgk