जगभरातील उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचं मुंबईत आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झालं. स्वीडन आणि फिनलँडच्या पंतप्रधानांची यावेळी खास उपस्थिती होती. महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वाणिज्य राज्यमंत्री निर्मला सीतारामन या सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय उद्योगविश्वातील अनेक बडे चेहरे उपस्थित आहेत. ४९ देशांचे प्रतिनिधी आणि ६८ देशांतून दाखल झालेले शिष्टमंडळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे-
* मेक इन इंडियामध्ये कर प्रणाली सोपी आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येईल
* मेक इन इंडिया कार्यक्रमाने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे.
* तरूणांची ऊर्जा ही भारताची सर्वात मोठी शक्ती आणि भांडवल आहे.
* भारताकडे असलेल्या सर्व सोयी-सुविधा आम्ही गुंतवणूकदारासाठी खुल्या करत आहोत.
* भारत हे उद्योगांसाठी जागतिक दर्जाचे निर्मिती केंद्र व्हायला हवे.
* माझे सरकार सत्तेत आल्यापासून परदेशी गुंतवणुक ४८ टक्क्यांनी वाढली.
* २०१५ या वर्षात आम्ही आजवरची सर्वाधिक ऊर्जानिर्मिती केली. तसेच यावर्षीही आम्ही आजवरचे सर्वात जास्त कोळशाचे उत्पादन करू.
* भारतात व्यवसाय करायला सुलभ वातावरण तयार करणार
* भारतात परकीय गुंतवणूक वाढली आहे, मेक इन इंडियाचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती हे आहे.
* भारतात सर्वोत्तम पायाभूत सुविधा देण्याचा माझ्या सरकारने कार्यक्रम हाती घेतला आहे.
* भारत ही संधीची भूमी आहे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा