तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनीम्हणून ओळखल्या जाणाऱया अॅपलच्या आयफोनचे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारतात उत्पादन सुरू करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे. फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी कंपनी अॅपलच्या संपर्कात असून आयफोनचे उत्पादन भारतात केले जाण्याबाबत वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आयफोनच्या उत्पादनासाठी प्रयत्नशील असलेल्या फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित होणार असल्याचे समजते.
फॉक्सकॉन कंपनीच्या अधिकाऱयांचे पथक लवकरच भारतातील उत्पादनासाठी जागेची चाचपणी करण्यासाठी येणार असल्याची माहिती देखील राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे.
भारतात २०२० सालापर्यंत १० ते १२ सुविधा पुरविण्याचा प्राथमिक उद्देश फॉक्सकॉन कंपनीचा असून यामध्ये कारखाने आणि डेटाबेस सेंटर्सचा समावेश असणार आहे. परंतु, उत्पादनाबाबतची विस्तृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
फॉक्सकॉन ही तैवानस्थित इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील बलाढ्य कंपनी असून व्यावसायिक संवेदनशीलता बागळण्यासाठी कंपनीतर्फे भारतातील उत्पादनाची अधिक माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, फॉक्सकॉन कंपनीशी अद्याप कोणताही अधिकृत करार झालेले नसला तरी कंपनीचा आयफोन, आयपॅड आणि आयपॉडचे उत्पादन करण्याचा मानस असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, अॅपलच्या भारतातील प्रतिनिधीनेही आयफोनच्या भारतातील उत्पादनावर बोलणे टाळले आहे.
‘आयफोन’चे लवकरच महाराष्ट्रात उत्पादन?
तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनीम्हणून ओळखल्या जाणाऱया अॅपलच्या आयफोनचे 'मेक इन इंडिया' अंतर्गत भारतात उत्पादन सुरू करण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे.

First published on: 12-06-2015 at 02:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make in india plans for apples iphone