देशात बलात्काराच्या आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडण्यासाठी संसदेने कायदा करावा, अशी मागणी  रामदास आठवले यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली. लोणावळा येथे विवाहाला गेलेल्या सात वर्षे वयाच्या एका मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेबाबत चिंता व्यक्त करून आठवले म्हणाले की, बलात्कार करणाऱ्या इसमाचे हात आणि पाय तोडले जावेत व या सभागृहाने त्यासाठी कायदा करावा. पुरुष व स्त्री यांच्यातील शारीरिक संबंध जबरीने नव्हे तर परस्परसंमतीने व्हावेत, असे सांगून त्यांनी बलात्काऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा