सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे यापुढे गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक सरकारी विभाग आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांमध्ये स्वतंत्र दक्षता विभाग तयार करण्याची सूचना केंद्र सरकारने मांडली आहे. यासाठी प्रत्येक सरकारी विभाग आणि केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये प्रशासन आणि दक्षता विभाग पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे.केंद्रीय दक्षता आयोगाकडून जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, दक्षता पथकात कार्य करणारे निर्णयप्रक्रियेत अथवा इतर महत्त्वाच्या सेवेत नसावेत. संबंधित मंत्रालयाचे सचिव अथवा विभागाचे सचिव याबाबत प्रत्येक महिन्याला आढावा घेऊन पुढील कार्यवाही करतील. सर्व केंद्रीय विभागांमधून माहिती मिळवून त्याचा आढावा घेण्यात येईल.

Story img Loader