मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणारी पाकिस्तानातील किशोरवयीन कार्यकर्ती मलाला युसुफजई हिने ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांची बकिंगहॅम पॅलेस येथे भेट घेतली. जगातील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, असे आपल्याला मनापासून वाटते, असे या भेटीत मलालाने पुन्हा एकदा सांगितले. राणी एलिझाबेथ आणि युवराज फिलीप यांनी एक स्वागत समारंभ आयोजित केला होता. या भेटीत ‘आय एम मलाला’ या मलाला लिखित पुस्तकाची भेट तिच्या वडिलांनी राणी आणि युवराजांना दिली. या वेळी बोलताना, या देशातही अनेक मुले शाळेत जाऊ शकत नसल्याचे मी ऐकले आहे, असे मलाला म्हणाली. त्यावर त्यांच्या यजमानांनी ‘ब्रिटनमध्ये मुलांनी घरातून बाहेर पडावे म्हणून त्यांना शाळेत पाठवतात,’ असे मिस्कील उत्तर दिले.
राणी एलिझाबेथ यांच्याशी मलालाची भेट
मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणारी पाकिस्तानातील किशोरवयीन कार्यकर्ती मलाला युसुफजई हिने ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांची बकिंगहॅम पॅलेस येथे भेट घेतली.
First published on: 19-10-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malala yousafzai meets queen elizabeth attends reception at buckingham palace