पाकिस्तानच्या दुर्गम भागात महिला शिक्षणासाठी प्रयत्न करताना तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्याची शिकार झालेल्या मलाला युसफझाई हिला स्वीडनच्या ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’साठी नामांकन मिळाले आहे. ‘बाल नोबेल’ म्हणून ओळखले जाणारे हे पारितोषिक बाल हक्क आणि शिक्षण क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना दिले जाते.मलालाने केलेले काम जगभरातील बालकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे तिला या पारितोषिकासाठी नामांकन मिळाले, असे या पारितोषिकासाठी ज्युरीचे काम करणाऱ्या लिव क्जेलबर्ग यांनी सांगितले. ‘वर्ल्ड चिल्ड्रेन प्राइज’ हे २००० पासून देण्यात येते. ११० देशांतील ६० हजार शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवून या पारितोषिकासाठी बालकांना नामांकन देण्यात येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा