पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही भूमिका घेतल्याने तालिबान्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेली मलाला युसूफझाई हिच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे शुक्रवारी लष्कराने जाहीर केले.
तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये स्वात खोऱ्यात मलालावर जीवघेणा हल्ला केला होता. मलालावरील हल्ल्याचा सूत्रधार तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा कमांडर मुल्लाह फजलुल्लाह असल्याचे अटक करण्यात आलेल्या १० दहशतवाद्यांनी सांगितल्याचे इंटर सव्‍‌र्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक असिम सलीम बाजवा यांनी सांगितले.
गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केल्याचे बाजवा म्हणाले. मलालावर स्वात खोऱ्यातील मिनगोरा येथे हल्ला करण्यात आला होता. तेथून जवळच असलेल्या मलकंद येथून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा