क्वालालम्पूर येथून बीजिंगकडे झेपावलेले मलेशियन एअरलाइन्सचे बोइंग विमान चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात कोसळून २३९ जण ठार झाल्याची भीती आहे.
दोन तासांत संपर्क तुटला..
शनिवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात पाच भारतीय बेपत्ता असून त्यात बोरिवलीच्या कोळेकर कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. बेपत्ता विमानाचा शोध अद्याप सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी दिवसभर या अपघातग्रस्त विमानाचा शोध सुरू होता. विमानातील २२७ प्रवासी व १२ कर्मचारी बेपत्ता असून त्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. स्वानंद कोळेकर (२३), चेतना कोळेकर (५५), विनोद कोळेकर (५९), क्रांती शिरसाट (४४) व चंद्रिका शर्मा (५१) अशी त्यांची नावे आहेत.
बोरिवलीतील कुटुंबावर आपत्ती
बोरिवलीतील योगीनगरात राहणाऱ्या कोळेकर कुटुंबातील तिघांचा बेपत्ता प्रवाशांमध्ये समावेश आहे. विनोद व चेतना कोळेकर यांचा मुलगा संवेद बीजिंगमध्ये राहातो. त्याचा डॉक्टरेटचा पदवीदान समारंभ रविवारी होणार होता. या कार्यक्रमासाठी कोळेकर दाम्पत्य व त्यांचा धाकटा मुलगा स्वानंद बीजिंगला जात होते. मात्र, थेट विमान नसल्याने ते क्वालालम्पूर येथून ते बीजिंगला गेले असावेत, अशी शक्यता त्यांच्या शेजाऱ्यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा