मलेशियातील एका ख्रिश्चन वर्तमानपत्राने अल्ला हा शब्द वापरू नये असा निर्णय मलेशियामधील न्यायालयाने दिला आहे.
याआधी २००९ साली स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हेराल्ड या ख्रिश्चन वर्तमानपत्राला अल्ला शब्द वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र, आज तीन मुस्लिम न्यायाधिशांच्या न्यायालयात हा निर्णय फिरविण्यात आला आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, अल्ला हा शब्द ख्रिश्चन धर्मीयांच्या संस्कृतीचा भाग नसल्याने या शब्दाच्या वापराने मुस्लिम समाजामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे मुख्य न्यायाधीश मोहम्मद अली यांनी सांगितले. या निर्णयानंतर न्यायालयाबाहेर असलेल्या शेकडोंच्या मुस्लीम जमावाने अल्लाहू अकबरच्या घोषणा देण्यास सुरूवात केली व निर्णयाचे स्वागत केले. मलेशियातील न्यायालयाने दिलेला हा निर्णय धार्मिक मुद्दयावर लक्षवेधी ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysian court rules non muslims cannot use allah
Show comments