मलेशियात इस्लामिक स्टेटसारख्या दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या कारणावरून दोन मुलकी सेवकांसह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांनी आज सांगितले.
दहशतवाद विरोधी विभागाच्या विशेष शाखेने तीन राज्यात छापे टाकले असून २२ ते ३६ वयोगटातील आठ जणांना एकाचवेळी ताब्यात घेतले आहे. ते सर्व मलेशियाचे नागरिक आहेत.विभागाचे अध्यक्ष खालीद यांनी सांगितले की, यातील सहा जण तनझिम अल काईदाचे सदस्य असल्याचा संशय आहे. दोन संशयित अठ्ठावीस वर्षे वयाचे आहेत. ते आयसिसचे सदस्य असावेत. दोन मुलकी सेवकांना याच संघटनेशी संबंधावरून ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती.

Story img Loader