भारत आणि मालदीवमधील संबंधात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, मालदीवमधून भारतानं आपलं सैन्य मागे घ्यावे, अशी विनंती मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयानं केली आहे. मोहम्मद मुईझ यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतरच हे निवेदन जाहीर करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रपती कार्यालयानं काढलेल्या निवेदनात म्हटलं, “मालदीव सरकारनं भारताला आपलं सैन्य मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मोहम्मद मुईझ यांची राष्ट्रपती कार्यालयात भेट घेतली. तेव्हा औपचारिकपणे ही विनंती करण्यात आली आहे.”

हेही वाचा : मालदिवमधील ‘हिंदू भारता’बद्दलचा तिरस्कार मोदी कसे संपवणार? याचा चीनला फायदा होईल का?

शनिवारी ( १८ नोव्हेंबर ) मोहम्मद मुईझ यांनी मालदीवच्या राष्ट्रपतीपदी शपथ घेतली. या शपथ ग्रहण सोहळ्याला मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते.

हेही वाचा : अन्वयार्थ: मालदीवमधील सत्ताबदल

मुईझ यांचा पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे चीनधार्जिणा मानला जातो. मुईझ यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास भारतीय फौजांना मालदीवमधून हटवू आणि मोठ्या प्रमाणात भारताला अनुकूल असलेल्या देशाच्या व्यापार संबंधांचे संतुलन साधू, असे आश्वासन दिलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives president asks india to withdraw military personnel from island ssa