Maldives President Thanked To India : मालदीवरचं कर्ज फेडण्यासाठी भारताने सुलभ प्रक्रिया उपलब्ध करून दिल्याने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष, मोहम्मद मुइझ्झू यांनी भारताचे आभार मानले आहेत. तसंच, नवी दिल्ली आणि माले यांच्यात मजबूत संबंध प्रस्थापित होतील आणि मुक्त व्यापारावर स्वाक्षरी केली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुइझ्झू शुक्रवारी मालदीवमधील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. आपल्या भाषणादरम्यान, त्यांनी मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, आठ महिन्यांच्या ‘राजनैतिक यश’ साजरे करत प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली.
भारत आणि चीनचे मानले आभार
राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी मालदीवच्या कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत आणि चीनच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ज्यामुळे देश आर्थिक सार्वभौमत्व सुनिश्चित करू शकणारे आहे. राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी मालदीवच्या कर्जाची परतफेड सुलभ करण्यासाठी भारत आणि चीनच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, ज्यामुळे देश आर्थिक सार्वभौमत्व सुनिश्चित करू शकेल.
हेही वाचा >> मालदीवचे चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांची नवी दिल्ली भेट का महत्त्वाची? जाणून घ्या
डिसेंबर २०२३ पासून भारताचे मालवदीबरोबरचे संबंध बिघडले होते. लक्षद्वीप आणि मालदीवच्या सौंदर्यावरून हा वाद सुरू झाला होता. मालदीवने यावरून तुलनात्मक टीका करायला सुरुवात केल्यानंतर भारतातून मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही रोडावली. दरम्यान, मालदीवमध्ये असलेले भारताचे सैन्यही मागे घेण्याचे आदेश मालदीवने दिले. त्यामुळे हे संबंध आणखी ताणू लागले.
परंतु, काही वर्षांपूर्वी भारताने मालदीवला अनेकदा अर्थसहाय्य केलं आहे. या कर्जाची परतफेड करणं मालदीवकडून बाकी होतं. या कर्जाची परतफेड सुलभरितीने व्हावी अशी मागणी मालदीवने भारताकडे केली होती. ही मागणीही भारताने मान्य केली. त्यामुळे मालदीवने आता भारताचे आभार मानले आहेत.
हेही वाचा >> मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोदींच्या शेजारी; मेजवानी सोहळ्यातील ‘त्या’ फोटोची चर्चा!
मुक्त व्यापारासाठी करार करणार
अमेरिकन डॉलरची स्थानिक टंचाई दूर करण्याच्या गरजेवर भर देऊन ते म्हणाले की, “मालदीव सरकार भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत चलन अदलाबदल करारावर बोलणी करत आहे.” मालदीवच्या अध्यक्षांनी असेही जाहीर केले की त्यांचे प्रशासन युनायटेड किंगडमसोबत मुक्त व्यापार करारासाठी (FTA) वाटाघाटी करत आहे आणि भारतासोबत असाच करार होण्याची आशा व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्यात राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला हजेरी लावली होती. भारत मालदीवचा जवळचा मित्र असंही मुइझ्झू म्हणाले होते. मालदीव-आधारित द एडिशननुसार, गेल्या वर्षाच्या अखेरीस मालदीवने भारताला दिलेली कर्जाची रक्कम ६.२ अब्ज मालदीवियन रुफिया होती.
© IE Online Media Services (P) Ltd