मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आणि भारतीय नागरिकांबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर मालदीवची पर्यटन कोंडी करण्याचे सूर भारतातून उमटू लागले आहेत. मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यटकांमध्ये भारतीय पर्यटकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु, मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टिप्पण्यांनंतर भारतीय पर्यटक आणि पर्यटन कंपन्यांनी त्यांच्या मालदीववाऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे मालदीवच्या पर्यटन विभागाला मोठा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आपला मोर्चा चीनकडे वळवला. मालदीवचे अध्यक्ष पाच दिवसांचा चीन दौरा करून नुकतेच माघारी फिरले आहेत. या चीन दौऱ्यात त्यांनी चिनी सरकारला मालदीवमध्ये पर्यटक पाठवण्याची विनंती केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, चीनवरून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले, भले आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळालेला नाही. मुइज्जू यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा भारताकडे होता, असं म्हटलं जात आहे.

मुइज्जू हे चीनधार्जिणे आहेत ही गोष्ट एव्हाना भारतीय उपखंडातील लोकांपासून लपून रहिलेली नाही. मुइज्जू यांनी नुकतीच चीनवारी केली. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. एकीकडे भारताबरोबरचे संबंध ताणले गेले असताना मुइज्जू यांनी चीनचा दौऱ्या केल्याने अनेकांन्या भुवया उंचावल्या होत्या.

पाच दिवसीय चीन दौऱ्यावर असताना मोहम्मद मुइज्जू यांनी अनेक राजकीय भेटीगाठी केल्या. तसेच ते चीनच्या फुजियान प्रांतातील मालदीव बिझनेस फोरममध्ये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी चीन हा मालदीवचा सर्वांत जवळचा मित्र आणि विकासातला भागीदार असल्याचं वक्तव्य केलं होतं.

हे ही वाचा >> मालदीवच्या बाबतीत ‘वयम् पंचाधिकम् शतम्…’ असे आहेच, पण तरीही…

करोनापूर्वी चीन ही आमची (मालदीवची) प्रथम क्रमांकाची बाजारपेठ होती. चीनने हे स्थान परत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आमची विनंती आहे, असं मालदीव पर्यटन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. मुइज्जू यांनी चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) प्रकल्पाचेही कौतुक केले आणि त्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही देशांनी हिंदी महासागर बेटावर एकात्मिक पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी ५० दशलक्ष डॉलर्स इतक्या गुतवणुकीच्या प्रकल्पावर स्वाक्षरी केली.