वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अखेर मालदीवचे काळजीवाहू अध्यक्ष मोहम्मद वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ऑक्टोबर आणि ९ नोव्हेंबर रोजी मालदीवमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार होती. मात्र दोन्ही वेळी ही निवडणूक होऊ शकली नाही. यामागे वाहिद यांचाच हात असल्याचा आरोप केला जात होता. काही दिवसांपूर्वी, देशाच्या संविधानाचा दाखला देत मालदिवच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापतींनीही ‘कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अध्यक्षपदी राहण्याचा हक्क नाही’ असे बजावल्याने वाहिद यांच्यावरील देशांतर्गत दबावही वाढत होता. अखेर वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
आंतरराष्ट्रीय दबावामुळे मालदीवमध्ये वाहिद पायउतार
वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अखेर मालदीवचे काळजीवाहू अध्यक्ष मोहम्मद वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे
First published on: 16-11-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives president waheed steps down ahead of run off polls