माले : चीनधार्जिणे मानले जाणारे मालदीवचे अध्यक्ष मोहमद मोईझ्झू यांचा पक्ष रविवारी झालेल्या ‘पीपल्स मजलिस’च्या (मालदीवची संसद) निवडणुकीत बहुमताच्या समीप पोहोचला आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार त्यांच्या पिपल्स नॅशनल पार्टी या पक्षाला ९३पैकी ५९ जागा मिळाल्या आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या मालदिवन डेमोक्रेटिक पार्टीला आतापर्यंत केवळ १० जागा जिंकता आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”

रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३०पर्यंत मालदीवमध्ये मतदान झाले. तसेच भारतात थिरुवनंतपुरम, श्रीलंकेतील कोलंबो आणि मलेशियातील कौलालंपूर येथेही मालदीवच्या नागरिकांसाठी मतदानकेंद्र उभारण्यात आली होती. मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली असून अखेरचे वृत्त हाती आले, तेव्हा २०३ ठिकाणी मतमोजणी पूर्ण झाली होती. त्यानुसार मोइझ्झू यांच्या पक्षाला सर्वाधिक ५९ मते मिळाली आहेत. ९ ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. अलिकडेच मोइझ्झू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर महाभियोग चालविण्याची मागणी केली होती. मात्र मजलिसमध्ये मिळालेल्या या प्रचंड बहुमतामुळे आता त्यांच्यावरील महाभियोगाची ही टांगती तलवार दूर झाल्याचे मानले जात आहे. मोइझ्झू अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मालदीवमधील सर्व भारतीय सैनिकांची पाठवणी करण्याची घोषणा केली असून तशी कारवाईही सुरू झाली आहे. त्यांनी अध्यक्ष झाल्यानंतर चीनला भेट देऊन राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मालदीव आणि चीनमध्ये संरक्षणासह अनेक मुद्दयांवर अलिकडेच करारही करण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maldives pro china ruling party landslide victory in parliamentary elections zws