माले : मालदिवमधील नवे सरकार भारताशी केलेल्या १०० हून अधिक करारांचा आढावा घेत असल्याचे मालदीवच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष मोहमद मुइझ्झू यांनी मालदिवमधील भारतीय लष्करी अधिकाऱ्यांना मागे बोलावण्याची औपचारिक विनंती भारताला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सरकारने भारताशी केलेल्या करारांचे पुनरावलोकन करण्यास सुरूवात केली आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाचे अवर सचिव, मोहम्मद फिरुझूल अब्दुल खलील यांनी मालदीवमध्ये ७७ भारतीय लष्करी अधिकारी-कर्मचारी असल्याचे रविवारी सांगितले. भारताने दिलेल्या पहिल्या हेलिकॉप्टरचे व्यवस्थापन करण्यासाठी २४, डॉर्नियर विमानाच्या व्यवस्थापनासाठी २५ आणि आणखी एका हेलिकॉप्टरच्या व्यवस्थापनासाठी २६ त्याचबरोबर देखभाल आणि अभियांत्रिकीसाठी आणखी दोन कर्मचारी मालदिवमध्ये असल्याची माहिती फिरुझुल यांनी माध्यमांना दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा