मालदीव आणि भारत यांच्यातील भू-राजकीय द्वंद्वामुळे एका मुलाचा हाकनाक बळी गेला आहे. अवघ्या १४ व्या वर्षी मुलाला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या अहंकारी वृत्तीमुळे जीव गमवावा लागला आहे. या मुलाला ब्रेन ट्युमर होता. मुलाला पक्षघाताचा झटका आला तेव्हा त्याला वैद्यकीय उपचारांकरता एअरलिफ्ट करणे गरजेचे होते. परंतु, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांनी परवानगी न दिल्याने एअरलिफ्ट करता आले नाही. परिणामी या मुलाचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मालदीवमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पक्षाघाताचा झटका आला. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली. परिणामी त्याला त्याच्या गाफ अलिफ विलिंगिली या त्याच्या निवासस्थानातून राजधानी माले येथे नेण्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सची गरज होती. परंतु, अधिकाऱ्यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्स पुरवली नाही, असा कुटुंबाचा आरोप असल्याचे वृत्त मालदीवच्या माध्यमांनी दिले आहे. तसंच, हे एअर लिफ्ट करण्याकरता राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे मुलाला जीव गमावावा लागला आहे, असंही अनेक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.
“मुलाला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आम्ही तातडीने आयलंड एव्हिएशनशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांनी आमच्या कॉलला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी गुरुवारी सकाळी ८.३० वाजता फोनला प्रतिसाद दिले. अशा प्रकरणांसाठी एअर अॅम्ब्युलन्स असणे हा उपाय आहे”, अशी मुलाच्या वडिलांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. दरम्यान, मुलाला १६ तासांनी माले येथे नेण्यात आलं.
आरोप झाल्यानंतप कंपनीचं निवेदन
आसंधा कंपनी लिमिटेडनेने निवेदनात म्हटलं की, आपत्कालीनी एअर अॅम्ब्युलन्सची विनंती मिळाल्यानंतर लगेचच रुग्णाला माले येथे नेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु, दुर्दैवाना शेवटच्या क्षणी विमानात काही तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे आम्हाला एअर अम्ब्युलन्सची सुविधा देता आली नाही.
या प्रकरणानंतर मालदीवचे खासदार मीकाईल नसीम म्हणाले, “राष्ट्रपतींचे भारताविषयीचे वैर पूर्ण करण्यासाठी लोकांना त्यांच्या जीवाची किंमत मोजावी लागू नये”.