Mallikarjun Kharge on Sambhal Mosque Survey : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. खरगे म्हणाले, “भाजपा सरकार देशातील मशिदींचं सर्वेक्षण करून समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्तीतल्या रामलीला मैदानावर दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व इतर मागासवर्गीय समुदायाने आयोजित केलेल्या एका रॅलीला संबोधित करताना खर्गे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा प्रकारच्या सर्वेक्षणांना परवानगी देऊन लोक एकजूट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपाचे नेते लाल किल्ला, ताज महाल, कुतुब मिनार, चार मिनारसारख्या इमारती उद्ध्वस्त करणार आहेत का? कारण या इमारती मुसलमानांनी उभ्या केल्या आहेत”. उत्तर प्रदेशच्या संभलमधील दंगलीच्या घटनेवरून खर्गे यांनी भाजपावर टीका केली आहे. संभलमध्ये एका मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. खरंच तिथे मंदिर होतं का हे जाणून घेण्यासठी सर्वेक्षण केलं जात आहे. त्यामुळे संभलमध्ये दंगल उसळली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा