Mallikarjun Kharge : सध्या देशात असलेलं सरकार खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत जी वक्तव्यं करत आहेत ती क्लेशदायक आहेत. कुठलाही पडताळा न करता त्यांनी आरोप केले आहेत. सत्य काय आहे ते आधी जाणून घ्या त्यानंतर पंडित नेहरुंना दुषणं द्या, डॉ. आंबेडकरांचा अपमान करा. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातं आहे असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी ( Mallikarjun Kharge ) केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
“आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरुंबाबत जे काही सांगितलं आहे ते खोटं आहे. आज संसदेत जे काही घडलं ते योग्य नाही. लोकसभा, राज्यसभा या ठिकाणी अशा गोष्टी घडू नयेत हाच आमचा प्रयत्न असतो. आम्ही कुठलाही अडथळा आणलेला नाही. १४ दिवस सभागृहं कशी चालतील याकडेच आम्ही लक्ष दिलं आणि मग आंदोलन केलं” असंही खरगे ( Mallikarjun Kharge ) म्हणाले.
अदाणी देशाला लुटत आहेत या मुद्द्यावरही आम्ही आंदोलन केलं-खरगे
आमच्याकडे हा मुद्दा होता की अदाणी देशाला लुटत आहेत आणि त्या मुद्द्यावरुन आम्ही सरकारला प्रश्न करत होतो. त्यानंतर काही दिवसांपूर्वी संविधानाबाबत चर्चा सुरु झाली त्यावेळी अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खिल्ली उडवली. तुम्ही किती वेळा आंबेडकर-आंबेडकर असं म्हणता, त्याऐवजी तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्ही सात जन्म स्वर्गात असता. एखाद्या पक्षाची जर ही मानसिकता असेल, एखाद्या नेत्याची आहे तर ती निषेधार्ह आहे. अशा गोष्टी तुम्ही देशापुढे ठेवणार असाल तर काय बोलणार? एवढंच नाही तर त्यांच्यापैकी कुणीही चूक मान्य करायला तयार नाही. अमित शाह यांनी राजीनामा दिला पाहिजे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी ही मागणी आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा मुद्दा पुन्हा समोर आणला.
अमित शाह यांनी माफीही मागितलेली नाही-खरगे
आमच्या पक्षाचे सगळे खासदार आम्ही एकत्र आलो आम्ही काय म्हटलं? तर अमित शाह यांनी माफी मागावी. संपूर्ण भारतात यासाठी आंदोलन होतं आहे. मात्र या विषयावरुन लक्ष वेधलं जावं म्हणून दुसरे मुद्दे काढले जात आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आंदोलन सुरु केलं. त्यानंतर शांततापूर्ण मार्गाने आम्ही रांगेत चाललो होतो. त्यावेळी भाजपाच्या खासदारांना काय झालं ते मला माहीत नाही. मकरद्वार या ठिकाणी भाजपा खासदार आले आणि त्यांनी आम्हाला रोखलं. मसल पॉवर दाखवू लागले. त्या ठिकाणी इतके खासदार मोठ्या प्रमाणावर होते. आमच्या बरोबर ज्या महिला खासदार होत्या त्यांनाही रोखण्यात आलं. आमच्यावर हल्ला करण्यात आला. मला धक्का देण्यात आला, त्यावेळी माझा तोल सुटला आणि मी पटकन खाली बसलो. आता ते आमच्यावर आरोप करत आहेत की आम्ही धक्काबुक्की केली. मी कुणाला धक्का देण्याच्या स्थितीतही नाही. मात्र सत्ताधारी पक्षाचे खासदार आमची खिल्ली उडवत होते असाही आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी ( Mallikarjun Kharge ) केला.
आम्ही जे काही घडलं त्याविरोधात आंदोलन उभं करणार-खरगे
अशा पद्धतीने जे काही वातावरण संसदेत तयार करण्यात आलं ते भाजपा खासदारांचं कृत्य गैर आहे. आम्ही हे कधीही सहन करणार नाही. याविरोधात आम्ही आता आंदोलन उभं करणार आहोत. शांततापूर्ण पद्धतीने संसदेचं कामकाज सुरु होतं ती शांतता भंग करण्याचं काम भाजपा सरकारने केलं आहे. असा आरोप मल्लिकार्जुन खरगेंनी केला. त्यांच्याकडे आता बोलायला काहीही मुद्दे उरलेले नाहीत. खाया पिया कुछ नहीं ग्लास तोडा बाराह आना असं भाजपाचं धोरण आहे. असंही मल्लिकार्जुन खरगेंनी ( Mallikarjun Kharge ) म्हटलं आहे.