पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपण दिलेल्या आश्वासनांचे विस्मरण झाले आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाच राहिलेली नाही आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण या राज्यात सर्वाधिक आहे, असा हल्ला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येथे बुधवारी बॅनर्जी यांच्यावर चढविला. पाच वर्र्षांपूर्वी आमचा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास होता, मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना आपल्याच आश्वासनांचे विस्मरण झाले, त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली.

Story img Loader