केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी मोदी सरकारला लक्ष्य करत असतात. तर दुसरीकडे भाजपाचे नेतेदेखील पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका करताना दिसतात. दरम्यान आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला घेरलं आहे. भाजपाची राजवट ही हिटलर, मुसोलिनी तसेच स्टालीनपेक्षा वाईट आहे, असा घणाघाती हल्ला बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. त्या कोलकातामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हेही वाचा >>> जपानमधील भारतीय जनसमुदायाला मोदींनी केले संबोधित, म्हणाले ‘मागील आठ वर्षांत लोकशाही अधिक मजबूत’

“केंद्र सरकारकडून राज्य सरकारच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थाचा वापर करण्यात येत आहे. तसेच देशाच्या व्यवस्थेवर भाजपाकडून हल्ला केला जातोय. भाजपा सरकार अडॉल्फ हिटलर, जोसेफ स्टालीन तसेच बेनिटो मुसोलिनी यांच्यापेक्षा वाईट आहे,” असे ममता म्हणाल्या.

हेही वाचा >>> ओमिक्रॉनच्या बीए-५ उपप्रकाराचा भारतात शिरकाव, तेलंगणामध्ये आढळला पहिला रुग्ण

तसेच पुढे बोलताना त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना स्वायत्ता दिली पाहिजे. त्यांना स्वंतपत्रपणे काम करु दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. “संस्थांना स्वायत्तता दिली पाहिजे. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय या संस्थांना काम करु दिले पाहिजे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

हेही वाचा >>> VIDEO: “व्वा! तू हिंदी कुठे शिकलास?”, जपानी मुलाच्या तोंडून हिंदी ऐकताच मोदींकडून विचारणा, म्हणाले…

तसेच केंद्र सरकारने नुकतीच इंधनदरात कपात केली आहे. तसेच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्त्यांना २०० रुपयांची सबसीडी जाहीर केली आहे. या निर्णयावरदेखील ममता यांनी टीका केली आहे. “निवडणुकीपूर्वी भाजपकडून लोकप्रिय निर्णय घेतले जातात. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या थोड्याच लोकांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळतो. बाकीचे गरीब लोक ८०० रुपयांचा घरगुती गॅस कसा खरेदी करतील.,” असा सवाल ममता यांनी केला आहे.

Story img Loader