केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तृणमुल काँग्रेसला निधीबाबत तपशील देण्यासाठी नोटीस पाठवली आहे. त्यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतापल्या आहेत. सीबीआय हे पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते. त्यांच्या आदेशाशिवाय हे शक्य नाही असे सांगत त्यांनी थेट पंतप्रधानांवर टीका केली. सीबीआयने इतर कोणत्याही पक्षाला नोटीस पाठवलेली नाही. तृणमूल काँग्रेसच भाजपला आव्हान देऊ शकतो हे लक्षात घेऊन आम्हाला अडचणीत आणण्यासाठी पावले उचलल्याचा आरोप ममतांनी केला.

Story img Loader