गाडी यायला उशीर झाला म्हणून चिडलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला राग गुरुवारी सुरक्षारक्षकांवर काढला. रागाच्या भरात बॅनर्जीं सुरक्षारक्षकांना वाटेल तशा बोलल्या.
कोलकातामधील पुस्तक प्रदर्शन पाहून झाल्यानंतर बॅनर्जी तेथील गेट क्रमांक एकवर आपल्या गाडीची वाट बघत होत्या. मात्र, प्रदर्शनस्थळी मोठी गर्दी असल्यामुळे त्यांची गाडी गेटवर येण्यास उशीर झाला. गेटवर वाट पाहात उभे राहायला लागल्यामुळे ममता बॅनर्जी संतापल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तिथे असलेल्या सुरक्षारक्षकांवर आपला राग काढला. सुरक्षारक्षकांना त्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे प्रदर्शनाच्या एका आयोजकाने सांगितले.

Story img Loader