पीटीआय, कोलकाता

कोलकात्यामधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा एका आठवड्यात तपास करण्यात पोलिसांना अपयश आल्यास, हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी जाहीर केले. उत्तर कोलकात्यामधील आर जी कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील पदव्युत्तर विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्यामुळे राज्यात संतापाचे वातावरण आहे.

Murlidhar Mohol allegations, Sharad Pawar,
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, चारवेळा..!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
Police attempt to extort Money, claiming to be a CBI officer, pune,
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत उद्योजकाकडून १२ लाख उकळण्याचा पोलिसांचा प्रयत्न; वाचा काय आहे नेमके प्रकरण?
A decision to examine scholars in the city pune Municipal Commissioner order to fire brigade
शहरातील अभ्यासिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय, नक्की कारण काय ? महापालिका आयुक्तांचा अग्निशमन दलाला आदेश
Sassoon Hospital exceeds capacity facing burden of forensic cases steps are being taken to reduce it
‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
Mumbai officials ordered strict action against illegal activities ahead of assembly elections
निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश
Citizens wait for a month for birth and death records in Thane due to technical problems in CRS portal
ठाण्यात जन्म-मृत्यु दाखल्यांसाठी महिनाभराची प्रतिक्षा; नव्या प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा नागरिकांना फटका

रुग्णालयाच्या परिसंवाद सभागृहामध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह शुक्रवारी आढळला. तेव्हापासून राज्यात जनक्षोभ उसळला असून विविध सरकारी रुग्णालयांमधील शिकाऊ डॉक्टर, अंतर्वासित डॉक्टर आणि पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टर निदर्शने करत आहेत. दोषींना शिक्षा होईपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. शिवाय दिल्ली, बंगळूरु येथेही निदर्शने सुरू आहेत. दिल्लीतील सरकारी रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी बेमुदत संपाचे आवाहन केले आहे.

हेही वाचा >>>Sheikh Hasina : “बांगलादेशमध्ये परत या, पण…”, शेख हसीना यांना अंतरिम सरकारचं आवाहन!

हत्याप्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयात तीन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकांवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. टी. एस. शिवज्ञानम यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

पोलिसांनी शक्य तितक्या लवकर दोषींना अटक करावी. जर त्यांना रविवारपर्यंत या गुन्ह्याचा तपास लावता न आल्यास आम्ही हा तपास सीबीआयकडे सोपवू. सीबीआयच्या तपासात मला अडचण नाही, पण त्यांच्या यशाचे प्रमाण कमी आहे.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल