राजकीय पटलावर एकमेकांचे कडवे विरोधक असतानाही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या १२ वर्षांची परंपरा जपली आहे. ममता बॅनर्जी दरवर्षी देशाच्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आंब्याची पेटी पाठवतात. त्यानिमित्ताने यंदाही त्यांनी परंपरा जपत आंब्यांच्या पेट्या पाठवल्या आहेत. मंगळवारी या पेट्या पाठवण्यात आल्या असून येत्या एक ते दोन दिवसात ते मोदींच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.
इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, “हे आंबे मंगळवारी पाठवण्यात आले आहेत. हिमसागर, लक्ष्मणभोग आणि फाजिल जातींचे चार किलो आंबे पाठवण्यात आले आहेत.”
हेही वाचा >> VIDEO : केजरीवालांच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांच्या ‘मोदी… मोदी’ घोषणा, मुख्यमंत्री हात जोडून म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या आंब्याच्या पेट्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. तसंच, बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांनाही आंबे पाठवण्यात आले आहेत.
२०२१ मध्ये बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसिना यांनीही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मतता बॅनर्जी याच्यासाठी २६०० किलो आंबे पाठले होते.६० बॉक्समधून हरिभंगा जातीचे आंबे बांगलादेशी ट्रकमधून भारतात आले होते.