आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आता उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या मदतीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी धावून आल्यात. ममतांनी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेत सपाला पाठिंबा दिला. तसेच या निवडणुकीत सपाला ३०० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी उपस्थित सपा कार्यकर्त्यांकडे फुटबॉल भिरकावात ‘खेला होबे’ अशी घोषणा दिली.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “उत्तर प्रदेशमध्ये एनआरसीच्या वेळी एन्काऊंटरच्या नावावर किती लोकांना मारण्यात आलं हे आम्ही पाहिलं. खोट्या चकमकींमध्ये लोकांना मारण्याची गरज काय? कायद्याप्रमाणे काम करायला हवं. भाजपाने इतिहास बदलण्याचं काम केलं. भाजपाने शहीद ज्योत नष्ट करण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी खेळ सुरू आहे.”

Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
rohit pawar statement on bjp and modi,amit shah and yogi
महाराष्ट्र संतांची भूमी येथे “बटेंगे तो कटेंगे”ला थारा नाही…प्रफुल्ल पटेलांच्या गृहनगरातून रोहित पवारांनी…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

“आमचे शेतकरी आंदोलन करत होते आणि भाजपाच्या मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं. यासाठी भाजपाने माफी मागितली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये करोनामुळे लोक मरत होते तेव्हा योगी कोठे गेले होते? त्यांनी मृत लोकांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. लोकांना मृतदेह गंगा नदीत सोडण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. यासाठी जनतेची माफी मागा,” असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

“मोदींनी उत्तर प्रदेशला स्वतःच्या खिशातून पैसे दिले का?”

“मोदी म्हणतात आम्ही यूपीला पैसे दिले, तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे दिले का? हे सर्व पैसे राज्यांकडून मिळतात. ते जनतेचे पैसे आहेत. आज सकाळी ब्राह्मण समाजाचे लोक मला भेटायला आले होते. त्यांनी मी आल्यानंतर अखिलेश यादव यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं,” असंही ममतांनी नमूद केलं.

हेही वाचा : UP Polls: एक लाखाची रिव्हॉल्व्हर, ८० हजारांची रायफल आणि…; योगी आदित्यनाथांनी जाहीर केली संपत्ती

“आपली गंगा-जुमनी” परंपरा आहे”

यावेळी अखिलेश यादव म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी सत्यमेव जयतेचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आणि सर्व धर्मांध शक्तींना पराभूत करण्याचं काम केलं. तुम्ही बंगालमध्ये ऐतिहासिक लढाई केली. यासाठी मी तुमचे आणि बंगालच्या जनतेला धन्यवाद देतो. आपली गंगा-जुमनी” परंपरा आहे. त्याला बंगालच्या जनतेने पुढे नेलं आहे.”