कोलगेटनंतर रेल्वेगेट प्रकरणात कोंडलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी नवी तोफ डागली. यूपीए सरकारला तिसरी संधी मिळायला नको, अशी गर्जना करीत दिल्लीमध्ये परिवर्तनाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशभरातील प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन केंद्रात स्थिर सरकार देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोलकात्याजवळ गेल्या तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा महासभा घेणाऱ्या ममता बॅनर्जी म्हणाल्या, की दिल्लीमध्ये परिवर्तन होण्याची वेळ आली आहे. यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांनी येण्याची गरज आहे.

Story img Loader