पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधासाठी एकत्र आलेल्या पक्षांची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आहे. या आघाडीची आता पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. तसंच, या आघाडीला INDIA (Indian National Development Inclusive Alliance) हे नाव दिलं असल्याचंही आज जाहीर करण्यात आलं. यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> पंतप्रधान मोदींच्या विरोधात अखेर विरोधकांची एकजूट झाली; आघाडीचं नाव ठरलं INDIA! वाचा सविस्तर…

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आजची बैठक चांगली झाली. आजपासून खरं आव्हान सुरू झालं आहे. आमच्या २६ पक्षांच्या बैठकीत आघाडीला INDIA नाव देण्याचं ठरलं आहे. तुम्ही आधी युपीए नाव ऐकलं. एनडीए आताही आहे. पण प्रत्यक्षात हे अस्तित्वात नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अनेकांचं जीवन धोक्यात आहे. अल्पसंख्याक, बहुसंख्याक, मुस्लिम, शीख, ईसाई, दिल्ली, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बंगाल, महाराष्ट्र सर्वच धोक्यात आहेत. सरकार विकणं आणि सरकार खरेदी करणं हेच सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी खरं आव्हान स्वीकारलं आहे”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

“NDA CAN U CHALLENGE INDIA (एनडी इंडियाला आव्हान देऊ शकतं का?), BJP CAN YOU CHALLENGE INDIA (भाजपा इंडियाला चॅलेंज देऊ शकतं का?), CAN ANYBODY CHALLENGE INDIA (कोणी इंडियाला चॅलेंज करणार का?) आम्ही आमच्या देशावर प्रम करतो. देशप्रेमींवर आम्ही प्रेम करतो. आम्ही विद्यार्थी, शेतकरी, दलित, अर्थव्यवस्थेसाठी काम करतो. आम्ही देशासाठी आणि जगासाठी आहोत. यापुढे सर्व कार्यक्रम, जाहिरात इंडिया या बॅनर अंतर्गत होणार. जर तुम्हाला आव्हान द्यायचंय तर द्या”, असा एल्गारही ममता बॅनर्जी यांनी पुकारला.

हेही वाचा >> विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक मुंबईत, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा; म्हणाले, “२६ पक्ष एकत्र आल्याने पंतप्रधानांचे…”

“आपत्कालीन घटनेपासून देशाला वाचवा. देशातील जनतेला वाचवा. आम्हाला इंडियाला वाचवायचं आहे, आम्हाला देशाला वाचवायचं आहे. भाजपा देश विकण्यासाठी सौदागिरी करतंय. लोकशाहीला खरेदी करण्याची सौदागिरी सुरू आहे. स्वतंत्र्य यंत्रणांनाही काम करू देत नाहीत”, असंही ममता बॅनर्जी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjees elgar against bjp after opposition meeting said challenge to india sgk
Show comments