PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 :लोकसभा निवडणुकीत एनडीए सरकारला बहुमत मिळाले. परंतु, इंडिया आघाडीकडूनही सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तरीही इंडिया आघाडी सत्तास्थापन करू शकते, असा सूचक इशारा इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी दिला होता. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही असाच सूर लावला आहे. तसंच, नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी जाणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आज सरकार स्थापनेचा दावा केला नाही, म्हणजे उद्याही करणार नाही असं होत नाही. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार आमचेही मित्र आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाले. शनिवारी कालिघट निवासस्थानी तृणमूलच्या २९ खासदारांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. तसंच, एनडीए सरकार १५ दिवसही टिकणार नाही, असं म्हटलं.

“आम्ही योग्य परिस्थितीची वाट पाहत आहोत. लोकांना देण्यासारखे काहीही नसलेले हे अस्थितर, हतबल आणि कमकुवत सरकार माघारी परतले आणि त्यांनी त्यांचं ध्यान, तपश्चर्या पुन्हा सुरू केली तर आम्हाला आनंदच होईल. इंडिया आघाडी आपली बांधिलकी कायम ठेवेल”, असंही त्या म्हणाल्या.

मला मोदींना शुभेच्छा द्यायच्या नाहीत

पंतप्रधान पदाच्या शपथविधीच्या आमंत्रणाबाबत ते म्हणाले, आम्हाला ना आमंत्रण आले आहे आणि नाही आम्ही जाणार आहोत. हे सरकार अलोकशाही, असंवैधानिक आणि बेकायदा आहे. मला त्यांना शुभेच्छाही द्यायच्या नाहीत. माझ्या शुभेच्छा जनतेसाठी आहेत. एवढ्या मोठ्या तोट्यानंतर पंतप्रधानांची खुर्ची दुसऱ्या कोणाला तरी दिली असती तर मोदींसाठी ती योग्य बाब ठरली असती, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> लोकसभेची एकही जागा न लढवलेल्या रामदास आठवलेंना नव्या मंत्रिमंडळात संधी; प्रतिक्रिया देत म्हणाले, “दलित जनतेला…”

NRC रद्द करणे ही आमची पहिली मागणी

“मंत्रिमंडळाकडून पहिली मागणी एनआरसी रद्द करणे ही आहे. केंद्राने राज्याची थकबाकी त्वरीत भरावी आणि आम्हाला कमकुवत न समजता तृणमूल हा तिसरा सर्वांत मोठा पक्ष आहे. कारण, लोकसभा आणि राज्यसभेत आमचे ४२ खासदार आहेत”, असंही त्या पुढे म्हणाल्या. ज्यांनी आम्हाला मतदान केलं, ज्यांनी आम्हाला निवडून आणलं त्यांचे आम्ही आभार मानतो. मतदान करणे ही वैयक्तिक निवड आहे, असंही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >> PM Narendra Modi Oath Taking Ceremony Live Updates : मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक सुरू, व्हिडीओ आला समोर

आज सायंकाळी शपथविधी

आज सायंकाळी ७.१५ मिनिटांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. तर, ३० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात काही जुन्या मंत्र्यांनाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये नितीन गडकरी, अमित शाह, रामदास आठवलेंसह अनेक खासदारांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata banerjees pointed warning on the swearing in day itself said chandrababu and nitish kumar are also our friends sgk