निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारला काही अधिकाऱयांच्या बदलीचे आदेश दिले. यावर जोपर्यंत मी प्रभारी आहे तोपर्यंत पश्चिम बंगालमधील एकाही अधिकाऱयाची बदली करुन दाखवाच, असे आव्हान देत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर तोफ डागली आहे.
निवडणूक आयोगाने आज(सोमवार) पश्चिम बंगालमधील पाच पोलीस आयुक्त, एक जिल्हाधिकारी आणि दोन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्यासह इतर काही अधिकाऱयांची बदली करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला.
ममता बॅनर्जीं यावर प्रतिक्रिया देताना संतप्त होऊन म्हणाल्या की, “राज्य सरकारशी संपर्क न साधता निवडणूक आयोग एखाद्या राज्यातील अधिकाऱयांच्या बदल्या कशा काय करू शकते? त्यांच्या जागी नव्याने अधिकारी कसे काय नेमू शकते? तुम्ही केवळ काँग्रेस आणि भाजपचेच ऐकणार त्यांच्यासाठीच तुम्ही काम करत आहात. तुम्हाला माझा राजीनामा स्विकारावा लागेल. मी मुख्यमंत्री असले तरी तुमच्या आदेशाचे पालन करणार नाही, कोणत्याही अधिकाऱयाची बदली होऊ देणार नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा