हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱया सारढा समूहाच्या दोन वाहिन्या चालवायला घेण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी घेतला. 
सारढा चिटफंड कंपनीचे अध्यक्ष सुदिप्तो सेन सध्या अटकेत आहेत. त्यांच्या कंपनीच्या समूहाकडून तारा न्यूज आणि तारा म्युझिक या दोन वाहिन्या चालविण्यात येत होत्या. समूह अडचणीत आल्यानंतर या दोन्ही वाहिन्यांमधील कर्मचाऱयांनी राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारने या दोन वाहिन्या चालवायला घेण्याचा निर्णय घेतला.
या दोन्ही वाहिन्यांमधील कर्मचाऱयांना या महिन्यापासून प्रत्येकी १६ हजार रुपये मानधन देण्यात येईल. वाहिनी चालवण्यासाठी ममता बॅनर्जी मुख्यमंत्री निधीतून २६ लाख रुपये देणार आहेत. वाहिनीवर असलेल्या सहा कोटी रुपयांच्या कर्जाची कोणतीही हमी राज्य सरकारने घेतलेली नाही.
दरम्यान, अशा पद्धतीने वाहिनी चालवायला घेण्यासाठी राज्य सरकारला विधेयक आणावे लागणार असल्याबद्दल विचारल्यावर आम्ही या बाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवायचे की वटहुकूम काढायचा, याचा विचार करीत आहोत, असे बॅनर्जी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा