Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. उत्तम अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. मात्र मनमोहन सिंग यांना अॅक्सिडेंटल पीएम म्हणजेच अपघाताने झालेले पंतप्रधान असं म्हटलं गेलं. त्यांनी याबाबतही भाष्य केलं होतं.

काय म्हणाले होते मनमोहन सिंग?

२०१९ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ‘चेजिंग इंडिया’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी मनमोहन सिंग म्हणाले होते, मला देशात अॅक्सिडेंटल पीएम म्हटलं गेलं. मला तर वाटतं की मी अॅक्सिडेंटल अर्थमंत्रीही होतो. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो ज्यात मनमोहन सिंग यांनी ते अर्थमंत्री कसा झालो ते सांगितलं होतं. मनमोहन सिंग म्हणाले, “पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. त्यांनी मला फोन केला मला विचारलं की तुम्ही कुठे आहात? मी त्यांना सांगितलं मी माझ्या कार्यालयात बसलो आहे. त्यावेळी त्यांचं उत्तर आलं की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे.” मला मंत्री व्हायचं आहे हे मला त्यावेळी खरं वाटलं नव्हतं असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आता त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

हे पण वाचा- Manmohan Singh : मनमोहन सिंग हे कायम निळ्या रंगाची पगडी का घालत असत? काय होतं कारण?

राहुल गांधी यांची पोस्ट काय?

“मनमोहन सिंग यांनी एकात्मतेच्या, राष्ट्रीयत्वाच्या भावनेने देशाचा कारभार चालवला. त्यांची अर्थशास्त्रातली जाण खूप उत्तम होती. त्याचा आदर्श देश कायम घेत राहिल.श्रीमती कौर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्या प्रति मी सहवेदना व्यक्त करतो. मी आज माझे आदर्श आणि माझे मार्गदर्शक गमावले आहेत. काँग्रेस पक्षातले माझ्यासारखे लाखो लोक मनमोहन सिंग यांची आठवण अभिमानाने काढतील, त्यांना कायम स्मरणात ठेवतील.” या आशयाची पोस्ट राहुल गांधींनी केली आहे.

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांना डॉक्टरेट ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली

२००६ या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत (Cambridge University) ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो, याविषयी मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. ही आठवण आजही लोकांच्या स्मरणात आहे.डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, जेव्हा ते ‘केम्ब्रिज’मध्ये शिकत होते तेव्हा ते निळी पगडी घालायचे. यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते. डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात.

.

Story img Loader