मंदिर हा सर्वांचा श्रद्धेचा विषय आहे. मंदिरात जाऊन लोक सेवाभावाने पूजा-अर्चना करतात. काही भाविक श्रद्धेपोटी दानही करतात. काही भाविक केलेलं दान जाहीर करतात, तर काहीजण आपली नावे गुप्त ठेवतात. आता आंध्र प्रदेशातील एक भाविकाने मंदिरातील दानपेटीत १०० कोटींचा चेक टाकला होता. पण, बँकेत गेल्यावर मंदिर प्रशासनाला एकच धक्का बसला आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिम्हा मंदिरात हा प्रकार समोर आला आहे. एका भक्तीने मंदिरातील दानपेटीत १०० कोटी रुपयांचा चेक टाकला होता. २३ ऑगस्टला मंदिर प्रशासनाने दानपेटीतील पैशांची मोजणी केली. तेव्हा नोटांच्या ढिगाऱ्यात कर्मचाऱ्याला १०० कोटी रुपयांचा चेक आढळून आला. यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले.

हेही वाचा : २०० रुपये किलो टोमॅटोसाठी तयार व्हावं लागणार! या आठवड्यातील बाजारातील आकडेवारी पाहा

याची माहिती तातडीने मंदिर प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी त्रिनाध राव यांना दिली. यानंतर मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एमव्हीपी कॉलनी येथील कोटक बँकेच्या शाखेत धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी चेकबाबत चौकशी केली असता, सर्वांनाच धक्का बसला. कारण, चेकवर १०० कोटी रूपये लिहिले असले, तरी खात्यात फक्त १७ रुपये असल्याचं समोर आलं. बोड्डेपल्ली राधाकृष्ण व्यक्तीच्या नावाचं हे अकाउंट असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा : कुत्र्याला दूध पाजण्यासाठी चिमुकल्याची धडपड; नेटकरी म्हणाले, “यालाच म्हणतात संस्कार”

दरम्यान, श्री वराह लक्ष्मी नरसिम्हा मंदिरातील दानपेटीत भाविकांनी भरभरून दान केलं आहे. बुधवारी ( २३ ऑगस्ट ) मंदिर प्रशासनाने केलेल्या मोजणीत १.४९ कोटी रूपये, ८० ग्रॅम सोने आणि १० किलो चांदी भाविकांनी दान केली आहे.

Story img Loader