गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांची गय करणार नाही, असे आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमतीमध्ये स्पष्ट केले. या वक्तव्याला १२ तास व्हायच्या आतच झारखंडमधल्या रामगढमध्ये एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. अलीमुद्दीन अन्सारी उर्फ असगर अन्सारी आपल्या मारूती गाडीमध्ये गोमांस घेऊन चालला होता. बाजरटांड गावाजवळ एका समूहाने त्याची गाडी अडवली. त्याच्या गाडीत गोमांस असल्याचे पाहून त्याला बाहेर खेचले आणि बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्यात या असगर अन्सारीचा प्राण गेला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलीस दाखल झाले त्यांनी असगर अन्सारीला रूग्णालयातही नेले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. असगर अन्सारीची हत्या हा पूर्वनियोजत कट आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक आर. के मलिक यांनी म्हटले आहे. असगरच्या विरोधात काही मुलांचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर बीफ व्यापारात सहभागी असलेल्या काही व्यापाऱ्यांनी या असगरच्या हत्येची सुपारी दिली असण्याची शक्यता आहे असेही पोलिसांनी म्हटले आहे. तसेच हल्लेखोरांची ओळख आम्ही पटवली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असेही पोलिसांनी म्हटले आहे. गेल्या तीन दिवसांत बीफ प्रकरणावरून ही दुसरी हत्या आहे.

Shirdi double murder news in marathi
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; एक जखमी ; लुटमारीचा संशय, संशयीत ताब्यात
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Anda Bhurji, knife attack, Pimpri, Anda Bhurji money,
अंडाभुर्जी खाल्ल्याचे पैसे मागितल्याने चाकूने वार
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात
Amravati , Murder , immoral relationship,
अमरावती : अनैतिक संबंधातून हत्‍या, अपघाताचा बनाव
Mumbai, Youth murder , Dharavi, murder,
मुंबई : धारावीत तरुणाची हत्या; तिघांना अटक
Petrol theft suspect, Murder of youth Narhe area,
पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाचा खून करणारा माजी उपसरपंच गजाआड

साबरमतीमध्ये आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेचा कडाडून निषेध केला होता. मात्र त्यांच्या वक्तव्याशी कथित गोरक्षकांना आणि हिंसा पसरवणाऱ्यांना काहीही फरक पडलेला नाही, झारखंडमध्ये घडलेली ही हत्या ही याच प्रकाराचे द्योतक आहे. जोपर्यंत अशा समाजकंटकांना कडक शिक्षा केली जाणार नाही तोवर त्यांना जरब बसणार नाही. निदान आता तरी सरकारने कारवाई करावी अशी अपेक्षा लोकांना आहे.

Story img Loader