मध्य प्रदेशातील रतलाम याठिकाणी एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाने सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर सरकारवर तब्बल दहा हजार कोटींचा दावा ठोकला आहे. सामूहिक बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. या काळात आपल्या कुटुंबाचे अतोनात हाल झाले. दरम्यानच्या काळात लैंगिक संबंध ठेवता आले नाहीत. यामुळे झालेल्या मानसिक आणि शारिरीक त्रासासाठी सरकारने दहा हजार कोटींची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी संबंधित तरुणाने केली आहे.

कांतू उर्फ कांतीलाल भील (वय-३५) असं या तरुणाचं नाव आहे. त्याला २३ डिसेंबर २०२० रोजी पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी कांतीलाल हे घरातील एकमेव कमावते होते. पण त्यांना तुरुंगात जावं लागल्याने त्यांची वृद्ध आई, बायको आणि तीन मुलांचे अतोनात हाल झाले. त्यांना स्वत:चं पोट भरणंही कठीण झालं. या गुन्ह्यात कांतीलाल यांना जवळपास दोन वर्षे तुरुंगात राहावं लागलं. अलीकडेच २० ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.

Crime
Crime News : धक्कादायक! मेहुणीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; गुन्ह्यासाठी लागणार्‍या पैशांसाठी बँककडून घेतलं ४० हजारांचं कर्ज
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड? (फोटो सौजन्य पीटीआय)
बलात्काराच्या आरोपांवरून काँग्रेसच्या खासदाराला अटक; कोण आहेत राकेश राठोड?
vasai gangrape marathi news
अश्लील चित्रफितीच्या आधारे धमकावले, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Vijay Ghaywat, jail, Nagpur, loksatta news,
नागपूर : विकृत विजय घायवटची पुन्हा कारागृहात रवानगी
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
truth and dare rape news
पिंपरी : रावेतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Auto rickshaw driver arrested for raping young woman
मुंबई : तरूणीवर बलात्कार करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

हेही वाचा- मुंबई: १६ वर्षीय मुलीला ‘आयटम’ म्हणणं तरुणाला पडलं महागात, कोर्टाने सुनावली दीड वर्षांची शिक्षा

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कांतीलाल यांनी मध्य प्रदेश सरकार आणि सामूहिक बलात्काराचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात १० हजार कोटींचा दावा ठोकला आहे. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात याबाबतचा खटला दाखल केला आहे. येत्या १० जानेवारीला यावर सुनावणी होणार आहे. न्यायालय यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

कांतीलाल भील यांचे वकील विजय सिंह यादव यांच्या मते, २० जुलै २०१८ रोजी एका महिलेनं कांतीलाल भील यांच्याविरुद्ध मनसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कांतीलाल याने एका महिलेला तिच्या भावाच्या घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला होता, असा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता. यानंतर कांतीलाल याने संबंधित महिलेला तिच्या भावाकडे सोडण्याऐवजी अन्य एका व्यक्तीच्या हवाली केलं. दुसऱ्या व्यक्तीनेही तिच्यावर सहा महिने बलात्कार केला, असा दावाही तक्रारदार महिलेनं केला. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत भील यांना अटक केली. या गुन्ह्यात कांतीलाल यांना सुमारे दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.

Story img Loader