Man arrested in Ayodhya Ram Mandir for wearing glasses : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात दररोज नव नवीन वस्तूंचे शोध लागत आहेत. आता लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे महागडे स्मार्टफोन आणि त्यामध्ये चांगल्या दर्जाचा कॅमेरे पाहायला मिळतात. इतकेच नाही तर इतरही अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तुंमध्ये देखील नव्या तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. अशाच प्रकारचा नवे तंत्रज्ञान वापरून बनवलेला चष्मा अयोध्येतील राम मंदिरात घातल्याप्रकरणी एका तरूणाला अटक करण्यात आली आहे.

सामान्यत: लोक फॅशन म्हणून वापरतात अगदी तसाच दिसणारा हा चष्मा आहे. पण यामध्ये काही खास वैशिष्ट्ये दडलेली आहेत. या चष्म्याच्या दोन्ही लेन्सवर १२ मेगापिक्सेलचे अल्ट्रा वाइड कॅमेरे देण्यात आलेले आहेत. म्हणजेच या चष्म्यावरील कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही दर्जेदार फोटो आणि व्हिडीओ काढू शकता. तसेच याचा वापरकर्ता १०८०पी गुणवत्तेचे ६० सेकंदापर्यंतचे व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आणि तो व्हिडीओ तात्काळ आपल्या संपर्कातील व्यक्तीला एआय आणि व्हॉईस कमांडच्या मतदीने पाठवू शकतो.

UP Woman Elopes With Beggar
भिकाऱ्याच्या प्रेमात बुडाली, सहा मुलांना टाकून महिलेनं ठोकली धूम; पतीकडून गुन्हा दाखल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
six brothers marrying sisters in Pakistan
पाकिस्तानमध्ये सहा भावांचे सहा बहिणींशी लग्न, लहान भावाचे वय १८ वर्ष होण्यासाठी वर्षभर थांबले; या लग्नाची चर्चा का होतेय?
Spanish Tourist girl gored to death While bathing elephant
Elephant Attack : २२ वर्षीय तरुणीच्या थायलंड ट्रीपचा करुण अंत… आंघोळ घालताना हत्ती बिथरला अन्…
RSS workers sentenced to life for 2005 murder Case
RSS Workers : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ स्वयंसेवकांना जन्मठेप, १९ वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
Atul Subhash suicide case child custody
Atul Subhash Case: ‘आजी त्याच्यासाठी अनोळखी’, अतुल सुभाष यांच्या आईला नातवाचा ताबा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
What Rajiv Kumar Said?
Rajiv Kumar : राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”

अयोध्येत नेमकं काय झालं?

गुजरातच्या वडोदरा येथील जयकुमार नावाच्या एका तरूणाला अयोध्येतील राम मंदिराच्या आतील भागाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तो त्याच्या चष्म्यातील कॅमेरा वापरून फोटो काढत होता. मिडिया रिपोर्टनुसार जयकुमार हा कोणतीही परवानगी न घेतो मंदिरातील आतील भागाचे फोटो काढण्याच्या प्रयत्नात होता. अयोध्येतील राम मंदिर परिसरात मोबाईल फोन आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी आहे. मंदिराची गोपनियता आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा>> राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”

चष्म्याची वैशिष्ट्य काय आहेत?

या चष्म्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे ओपम एअर ऑडिओ स्टीस्टम ज्यामध्ये वापरकर्त्याच्या कानांजवळ टेम्पल टीप स्पीकर देण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्ही हा चष्मा घातल्यानंतर गर्दीमध्ये देखील तुम्ही गाणी, पॉडकास्ट ऐकण्याबरोबरच, फोन कॉल्सवर बोलण्याचा आनंदही घेऊ शकता. तसेच यामध्ये पाच मायक्रोफन देण्यात आले आहेत ज्याच्या मदतीने तुम्हा व्हॉईस कमांड आणि रेकॉर्डिंग ही वैशिष्ट्ये वापरू शकता.

Story img Loader