पाश्चिम युरोपमधील बेल्जियम देशामध्ये करोना लसीकरणासंदर्भातील घोटाळा समोर आलाय. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार येथील एका व्यक्तीने तब्बल आठ वेळा करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. स्वत: लस घेऊन बनावट नावचं लसीकरण प्रमाणपत्र इतरांना देण्यासाठी त्याने हा उद्योग केल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे आठ वेळा लस घेऊनही या व्यक्तीवर लसीचे काही विपरीत परिणाम झालेले नाही. नवव्यांदा लस घेण्यासाठी ही व्यक्ती लसीकरण केंद्रावर पोहचली तेव्हा त्याची फसवणूक समोर आली आणि त्याला अटक करण्यात आलीय.

समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण वलून प्रांतामधील शॉर्लरॉय शहरामधील आहे. या शहराची लोकसंख्या दोन लाख इतकी आहे. आरोपी व्यक्ती पैसे घेऊन दुसऱ्यांच्या नावाने स्वत: लस घ्यायचा. याच फसवणुकीच्या प्रकरणात या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.

बेल्जियममधील लावेनिर या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार लस न घेताच लसीकरणाचं प्रमाणपत्र हवं असणाऱ्या व्यक्तींना आरोपी समोरुन संपर्क करायचा. या अशा लोकांकडून आरोपी मोठी रक्कम घ्यायचा आणि खोट्या नावाने लसीकरण करुन घ्यायचा. या व्यक्तींच्या नावाने नोंदणी करुन आरोपी लस घ्यायच्या.

नक्की वाचा >> Coronavirus: वुहान लॉकडाउननंतरचा चीनचा सर्वात मोठा निर्णय; १ कोटी ३० लाख लोकसंख्येचं संपूर्ण शहरच केलं क्वारंटाइन

बेल्जियम पोलिसांनी या प्रकरणाबद्दल गुप्तता बाळगली असून आरोपी तसेच त्याच्या मदतीने खोटी लसीकरण सर्टीफिकेट घेणाऱ्यांच्या नावांबद्दल खुलासा केलेला नाही. मात्र या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याने हा घोटाळा कसा केला, त्याला प्रशासनातील कोणाची साथ होती का, यासारख्या प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत आहेत. मात्र पैशासाठी जीव धोक्यात घालून आठ वेळा लसीकरण करुन घेण्याचं हे प्रकरण पाहून पोलिसही चक्रावून गेलेत.

नक्की वाचा >> “करोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदी ‘मृतदेहांचं डम्पिंग ग्राऊंड’ झालेली”; स्वच्छ गंगा मोहिमेच्या प्रमुखांचा दावा

बेल्जियममध्ये आतापर्यंत करोनाचे २० लाख १७ हजार रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी १५ लाख ५३ हजार जणांनी करोनावर मात केलीय. तर सक्रीय रुग्णांची संख्या ४ लाख ३५ हजार इतकी आहे. २७ जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. तर ७४३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> अमेरिकेत साडेसात लाख कोटींचा COVID-19 Relief Funds घोटाळा

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बेल्जियममध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. २६ डिसेंबरपासून इंडोअर मार्केट, चित्रपटगृह, कॉनर्स्ट हॉल बंद करण्यात येणार आहेत. दर्शकांच्या उपस्थितीशिवाय खेळाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

Story img Loader