Interfaith Marriage : उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या सदस्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. हा तरुण कोर्टात त्याच्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी गेला होता. त्याच्यावर लव्ह जिहादचा आरोप करण्यात आला असून या आरोपाखाली त्याला अटकही करण्यात आली आहे. परंतु हल्लेखोरांवरिोधात कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. उत्तर प्रदेशच्या भोपाळ येथे ही घटना घडली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोर्टात प्रचंड गर्दी होती. या गर्दीतही या तरुणावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “या जोडप्याने लग्नाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे न्यायालयाच्या आवारात गेले. नरसिंहपूर येथील रहिवासी असलेला हा तरुण महिलेसोबत भोपाळला गेला होता, परंतु तो न्यायालयीन औपचारिकता पूर्ण करू शकला नाही.”

तरुणाच्या मोबाईलमध्ये हिंदू महिलांचे फोटो

संस्कृती बचाओ मंचचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी यांनी आरोप केला की, त्या तरुणाच्या मोबाईलमध्ये हिंदू महिलांचे अनेक फोटो आणि संपर्क क्रमांक होते आणि त्याने या मुलीला लग्न करण्यासआठी भाग पाडले होते”. पोलिसांनी त्या तरुणावर बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा” अशी मागणीही या संघटनेने केली आहे.

भोपाळचे एसीपी अक्षय चौधरी यांनी घटनेविषयी सांगितले की, विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करण्यासाठी हे जोडपं भोपाळला आले होते. प्रथम त्या जोडप्याला आमच्या ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. महिलेने आम्हाला सांगितले की तिला त्याच्याशी लग्न करण्यास आणि धर्म बदलण्यास भाग पाडले जात आहे.”

तीन महिन्यांपासून तरुणीला त्रास

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी महिलेच्या आईने पोलिसांना सांगितले की, तो माणूस गेल्या तीन वर्षांपासून तिच्या मुलीला त्रास देत होता. मध्य प्रदेश धर्म स्वातंत्र्य कायदा, २०२१ च्या कलम ३/५ अंतर्गत या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांनी त्याच्या स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्याच्या मागील गुन्हेगारी नोंदी तपासल्या आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “व्हिडिओमधील हल्लेखोरांविरुद्ध कोणताही एफआयआर नोंदवलेला नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. त्या व्यक्तीने आतापर्यंत हल्लेखोरांविरुद्ध कोणतेही निवेदन दिलेले नाही.”