नोकरी करण्याच्या निर्णयावरून झालेल्या वादातून सासऱ्याने सुनेच्या डोक्यावर विट मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी दिल्लीच्या प्रेम नगर भागात ही घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला १७ टाके पडले आहेत. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी आरोपी सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा – Foxcon कंपनीला प्रथमच मिळाली Airpods ची ऑर्डर; भारतातील ‘या’ राज्यात करणार तब्बल १६०० कोटींची गुंतवणूक
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या प्रेमनगर भागात राहणारी २६ वर्षीय महिला नोकरी करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेली होती. मात्र, सासऱ्याने नोकरी करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत तिला रोखण्याचा प्रयत्न केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या डोक्यावर विटने हल्ला केला.
हेही वाचा – ७०० भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाहून ‘घर’वापसी; बनावट व्हिसाप्रकरणी होणार कारवाई
स्थानिकांनी मध्येच हस्तक्षेप करत महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला १७ टाके पडले आहेत. दरम्यान, याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी आरोपी सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.