गुजरातमधील सुरत येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीबरोबर क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याने आपल्या प्रेयसीला वायरने मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, निकुंज कुमार अमृत भाई पटेल असं आरोपीचं नाव आहे. तो विवाहित आहे. त्यानं विवाहित असल्याची बाब लपवून ठेवत पीडित तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. त्याची पत्नी दुसऱ्या गावात वेगळी राहात होती. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. पण आरोपीचं बिंग फुटल्यानंतर दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. यानंतर पीडित तरुणीने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला.
तिच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या आरोपी पटेलने तिला वायरने मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली. तसेच तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचीही धमकी दिली. या संतापजनक घटनेनंतर गंभीर दुखापत झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.
हेही वाचा- “आधी पॉर्न बघायचा मग चिमुकल्या मुलींना शोधून करायचा बलात्कार”, ३० जणींचा जीव घेणारा नराधम अखेर दोषी
याप्रकरणी ओलपाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आयपीसी ३७६ सह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.