माहेरी गेलेली पत्नी घरी आली नाही म्हणून सासरी जाऊन पतीने वाद घातल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र उत्तर प्रदेशमधील आग्र्यामधील झारपुर गावामध्ये एक विचित्र प्रकार समोर आलाय. या गावातील एका घरामध्ये एक जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे घराचे दरवाजे. खिडक्या आणि सामानाचेही काही प्रमाणात नुकसान झालंय. छोट्याश्या गावातील घरात झालेल्या या स्फोटाप्रकरणी घर मालकाने थेट जावयाविरोधात तक्रार दाखल केलीय. पोलीस सध्या या तक्रारीच्या आधारे घरमालकाच्या जावयाचा शोध घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा सारा प्रकार लाखन सिंह यांच्या घरी पहाटे चारच्या सुमारास घडला. अचानक स्फोट झाल्याने घरातील सर्वजण बाहेर पळाले. स्फोटाचा आवाज एवढा होता की शेजारीही जागे झाले. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ उडला. संबंधित घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीण, स्थानिक पोलीस अधिकारी सौरभ कुमार हे गावामध्ये घटनास्थळाची पहाणी करण्यासाठी पोहोचले.

पोलिसांनी या प्रकरणी कोणावर संशय आहे का असं विचारलं असता घरामालक लाखन सिंह यांनी जावई हरी सिंहविरोधात तक्रार दाखल केलीय. ताजगंज येथील रहिवाशी असणारा हरी सिंह हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं लाखन सिंह यांनी म्हटलंय. हरीच्या छळाला कंटाळून माझी मुलगी मागील वर्षभरापासून सासरी गेलेली नाही. ती आमच्यासोबतच राहते असं लाखन सिंह यांनी पोलिसांना सांगितलं आहे. मात्र तेव्हापासूनच हरी सिंह तिल्या धमकावत आहे, असा आरोप लाखन सिंह यांनी केलाय. याच रागामधून जावयाने हा स्फोट घडवून आणल्याची तक्रार लाखन सिंह यांनी केलीय.

रविवारी रात्री हरी सिंह पत्नीला घेऊन जाण्यासाठी सासरवाडीला गेला होता. मात्र हरीच्या पत्नीने म्हणजेच लाखन यांच्या मुलीनं सासरी परतण्यास नकार दिला. त्यामुळेच संतापलेल्या हरी सिंहने सासऱ्यांच्या घरात पहाटे चारच्या सुमारास सुतळी बॉम्ब लावल्याचं प्रथामिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र हा नक्की सुतळी बॉम्ब होता की आणखी काही यासंदर्भात तपास सुरु आहे. मात्र पहाटे चारच्या सुमारास झालेल्या या स्फोटामुळे घरातील सर्वचजण घाबरुन घराबाहेर पळाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man blast at house of in laws in agara uttra pradesh scsg