उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत असलेल्या मृतदेह सापडला आहे. एक व्यक्ती बराच वेळ मृतदेह डोक्यावर घेऊन फिरत होती. त्यानंतर त्याने एका कॉलनीच्या कोपऱ्यात तो मृतदेह फेकला आणि निघून गेला. परिसरात राहणाऱ्या लोकांनी कॉलनीत एक बांधून ठेवलेलं पोतं पाहिलं. ते उघडल्यावर त्यात त्यांना महिलेचा विवस्त्र मृतदेह दिसला. घाबरलेल्या स्थानिकांनी लगेच पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिस फॉरेन्सिक तज्ज्ञांना आणि श्वानपथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. ही घटना मेरठमधल्या सरखौदा पोलीस टाण्याअंतर्गत असलेल्या परिसरात घडली आहे.
मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यामध्ये सकाळी ७.०५ वाजता एक व्यक्ती पोतं डोक्यावर घेऊन फिरताना दिसला. त्याने मृतदेह त्या पोत्यात भरला होता. या व्यक्तीचं वव ३५ ते ४० वर्ष इतकं आहे. मृतदेह कॉलनीमध्ये फेकल्यानंतर तो बराच वेळ तिथे फिरत होता.
पोत्यातला मृतदेह कोणाचा आहे? कुठून आणला होता? त्या तरुणीची हत्या कोणी केली आहे? हत्येचं कारण काय? मृतदेह फेकणारी ती व्यक्ती कोण होती? यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमधील त्या व्यक्तीचे फोटो वेगवेगळ्या पोलीस टाण्यात पाठवण्यात आले आहेत.
मारेकऱ्याचा तपास सुरू
पोलीस अधीक्षक अनिरुद्ध सिंह यांनी सांगितलं की, “झाकीर कॉलनी आणि जमनानगर दरम्यानच्या रस्त्याला लागून असलेल्या एका कॉलनीत महिलेचा मृतदेह पोत्यात सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे. त्यात मारेकरी दिसत आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.”
हे ही वाचा >> “वेड्यांच्या रुग्णालयात..”, सुषमा अंधारेंची तानाजी सावंत यांच्यावर खोचक टीका; म्हणाल्या, “काही लोक आरशात बघून…”
महिलेचं वय ३० वर्ष, पोत्याजवळ सापडली ५०० रुपयांची नोट
या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तिचं वय ३० ते ३५ वर्षांच्या आसपास आहे. मृतदेह पूर्णपणे नग्नावस्थेत होता. चेहऱ्यावर कापल्याचे डाग आहेत. नाकातून रक्त वाहत होतं. तसेच पोतं जिथे ठेवलं होतं तिथे ५०० रुपयांची एक नोट देखील सापडली आहे. ही नोट पडली आहे की, ठेवली होती याचादेखील पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, या महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली गेली असावी. परंतु ही बाब पोस्टमार्टम रिपोरट्नंतरच स्पष्ट होईल.