बंगळुरूतील एका व्यक्तीनं रविवारी स्वत:ला गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. एस. प्रदीप असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजपा आमदारांसह सहा जणांची नावे असून पैसे परत न केल्याने मी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचे त्याने म्हटलं आहे.
प्रदीपने लिहिलेल्या सुसाईड नोटनुसार, त्याने २०१८ मध्ये एका क्लबसाठी गोपी आणि सोमाया यांना १.८ कोटी रुपये दिले. तसेच त्यांनी प्रत्येक महिल्यांना तीन लाख रुपये परत देईल, असे आश्वासन प्रदीपला दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे परत देण्यास नकार दिला. त्यामुळे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी प्रदीपला आणखी कर्ज घ्यावे लागले. तसेच त्याला त्याचे राहते घर आणि शेतीही विकावी लागली. त्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या प्रदीपने भाजपा आमदार अरविंद लिंबावली यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर दोघांनी ९० लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुन्हा त्यांनी आश्वासन पूर्ण केले नाही. याचबरोबर स्थानिक डॉक्टर जयप्रकार रेड्डी यांनी संपत्तीच्या वादावरून प्रदीपच्या भावाविरोधात दिवाणी खटला दाखल केला. अखेर या त्रासाला कंटाळून प्रदीपने आत्महत्या केली.
हेही वाचा – “जिम, रेस्टॉरंट सोबत मद्याचीही गरज”, कर्मचाऱ्यांच्या मौजमस्तीसाठी नोएडा आयटी पार्कने घेतला महत्त्वाचा निर्णय
दरम्यान, डॉ. जयप्रकार रेड्डी आणि भाजपा आमदार अरविंद लिंबावली यांचाही गोपी आणि सोमाया यांना पाठिंबा असून माझ्या आत्महत्येला ते सुद्धा जबाबदार असल्याचे प्रदीने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.