Man Demands half of deceased fathers body Crime News : मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावर दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. या घटनेत वडिलांचे अंत्यसंस्कार करताना दोन भावांमध्ये वाद झाला, ज्यामध्ये एका भावाने वडिलांचे शरीर आपल्याला मिळावे अशी मागणी केली. वाद इतका विकोपाला गेला की अखेर पोलिसांना या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला.
पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, हा सर्व प्रकार जिल्हा मुख्यालयापासून ४५ किमी अंतरावर लिधोराताल गावात झाला. जतारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद सिंग डांगी यांनी सांगितलं की दोन भावांमध्ये वाद झाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली होती.
नेमकं झालं काय?
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले खी ध्यानी सिंह घोष (८४) हे त्यांच्या धाकटा मुलगा देशराज याच्याबरोबर राहत होते आणि रविवारी दीर्घ आजारानंतर त्यांचे निधन झाले. त्यानंतर दुसरीकडे राहणार्या त्यांच्या थोरल्या मुलगा किशन याला त्यांच्या निधनाबद्दल माहिती देण्यात आली. जेव्हा किशन तेथे पोहचला तेव्हा त्याने अंत्यसंस्कार करण्यावरून गोंधळ सुरू केला, तर धाकट्या मुलाने दावा केला की मृत वडिलांची इच्छा होती की त्यानेच अंत्यसंस्कार करावेत.
पोलिसांनी केला हस्तक्षेप
पण दारूच्या नशेत असलेला किशन वाद घालण्यास सुरूवात केली आणि मृतदेहाचे दोन तुकडे करून ते दोन भावांमध्ये वाटले जावेत अशी मागणी करू लागला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहचले आणि किशनची समजूत घातली ज्यानंतर धाकट्या मुलाने अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण केले.
© IE Online Media Services (P) Ltd