राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. राज मोहम्मद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तामिळनाडूतील पुडुकुडी येथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि कर्नाटकसह आरएसएसची ६ कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी मोहम्मदने व्हॉटसअॅपद्वारे दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धमकीनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली

मोहम्मदने एका विदेशी नंबरवरून लखनऊ आणि उन्नावमधील नवाबगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ. नीळकंठ मणी पुजारींना व्हॉटसअॅपवर हा मेसेज मोहम्मदने पाठवला होता. या धमकीनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला होता.

एवढचं नाही तर उत्तरप्रदेश आणि कर्नाटकसह ६ ठिकाणच्या आरएसएस कार्यालय उडवून देण्याची धमकी मोहम्मद ने दिली होती. हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज मिळाले आहेत. धमकीचे मेसेज पाठवणारा मोहम्मदला तमिळनाडू पोलिसांनी अटक केली असून, उत्तर प्रदेश पोलीस आता त्याला आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man detained in tamil nadu who threatened to blow up rss offices at six locations dpj
Show comments